जुन्या वादातून खून करुन मृतदेह नदी पात्रात टाकला!

0

जुन्या वादातून खून करुन मृतदेह नदी पात्रात टाकला!


कळंब :- तालुक्यातील  रत्नापूर येथील फुलचंद महादेव निकम, वय 57 वर्षे यांचा मृतदेह दि. 13 ऑक्टोबर रोजी ईटकुर जवळील नदिपात्रात आढळल्याने अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2021 नोंदवून फौ.प्र.सं. कलम- 174 नुसार चौकशी सुरु करण्यात आली होती. कन्हेरवाडी ग्रामस्थ- भागवत शंकर कवडे यांसह त्यांचे कुटूंबीय- लता, दत्ता, सचिन यांनी जुन्या वादातून फुलचंद यांना मारहान करुन त्यांचा खून करुन मृतदेह नदी पात्रात टाकला आहे अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- गौरव याने चौकशी दरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरून भा.दं.सं. कलम- 302, 201, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top