महसूल विभाग तहसील कार्यालय लोहारा यांच्या मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व महात्मा गांधी जयंती निमित्त 2 आक्टोबर 2021 रोजी तहसील कार्यालयात व सर्व महसूल मंडळ कार्यालयात, सर्व तलाठी कार्यालयात महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्या निर्णयाने जिल्हाधिकारी उस्मानाबाद कौस्तुभ दिवेगावकर यांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना मोफत सुधारित नविन डिजीटल 7/12 उतारा वितरण शुभारंभ कार्यक्रम संपन्न

0

 लोहारा/प्रतिनिधी
महसूल विभाग तहसील कार्यालय लोहारा यांच्या मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व महात्मा गांधी जयंती निमित्त 2 आक्टोबर 2021 रोजी तहसील कार्यालयात व सर्व महसूल मंडळ कार्यालयात, सर्व तलाठी कार्यालयात महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्या निर्णयाने जिल्हाधिकारी उस्मानाबाद कौस्तुभ दिवेगावकर यांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना मोफत सुधारित नविन डिजीटल 7/12 उतारा वितरण शुभारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
लोहारा पं.स.च्या सभागृहात महसुल मंडळ लोहारा यांच्या वतीने शेतकऱ्यांना सुधारीत नविन डिजीटल 7/12 वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.स.सभापती सौ‌. हेमलता रणखांब होत्या तर प्रमुख म्हणून तहसीलदार संतोष रुईकर, माजी नगरसेवक आयुब शेख, प्रभारी नायब तहसीलदार एम.जी.जाधव, उपस्थित होते. यावेळी लोहारा मंडळातील शेतकरी शहाजी जाधव, आयुब शेख, बंडु वैरागकर, विरेंद्र नरुने, अल्लाबक्ष आत्तार, सय्यद इनामदार, मोहन गोरे, नितीन गोरे, दत्ता घाडगे, बालाजी माटे, श्रीधर गोरे, अनिता जाधव, अशोक क्षीरसागर, यांना पं.स.सभापती सौ.हेमलता रणखांब, तहसीलदार संतोष रुईकर, आदि, मान्यवरांच्या हस्ते नविन डिजीटल 7/12 उतारा वाटप करण्यात आला. यावेळी तहसीलदार संतोष रूईकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ अधिकारी बी.एस.भरनाळे, तलाठी बी.एस. हंगरगे, तलाठी एस.एस‌.गलांडे, तलाठी अरुण कांबळे, वजीर आत्तार, संतोष गवळी, विनोद जाधव, शहाजी जाधव, सय्यद इनामदार, यांच्यासह शेतकरी, प्रतिष्ठित नागरीक, तलाठी, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top