पारा येथील नवोदय प्रवेश पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार

0
पारा येथील नवोदय प्रवेश पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा हे गाव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवोदय प्रवेश दोन विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. दोन वर्षापासून आपल्याकडे कोरोना काळामुळे शाळा पूर्णपणे बंद आहेत पण ऑनलाइन पद्धतीने तास घेऊन पूर्णपणे कष्ट घेऊन काकासाहेब गावखरे यांनी याहीवर्षी वाशी तालुक्यामध्ये पारा शाळेचे दोन विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र देऊन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारा, या शाळेची परंपरा जपुन ठेवली आहे. 

आज दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे प्रवेश पात्र झालेल्या अफिफा आयुब शेख, व ऋषिकेश प्रवीण जाधव या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक श्री जोगदंड सर, सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश खोले , उपाध्यक्ष संजय भराटे,पालक व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शक शिक्षक श्री गावकरी काकासाहेब यांचाही सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top