जात पंचायती बरखास्त झाल्याच पाहिजेत.. अंनिसचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले सादर
उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्यात दोन तिन वर्षांनी एकदा तरी जात पंचायतीचे प्रकरण समोर येतेच..सर्वच जातीत जात पंचायती आहेत,पारधी समाजात याचे जास्त प्रमाण आहे,सध्या जात पंचायतच्या जाचक अटीमुळे सोमनाथ काळे मृत्यु प्रकरण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर गाजत आहे,दि.०७/१०/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक तुळजापूर येथे असल्याने संबंधित अधिकारी यांना भेटून सविस्तर चर्चा केली,उपपोलिस अधिक्षक अंजुम द.शेख मॅडम यांच्याशी समक्ष अगदी व्यवस्थित चर्चा केली.सोमनाथ काळे जात पंचायतीचा बळी गेल्याने संबंधितावर गुन्हा दाखल झाला परंतु सामाजिक बहिष्कार,संरक्षण आणि आर्थिक मदत याची मागणी निवेदनाद्वारे करीत गुन्हा नोंद करण्यात आलेल्या चार्ज सिट मध्ये सामाजिक बहिष्कार बाबतीतील सन २०१६ अधिनियमानुसार समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली असता उपपोलिस अधिक्षक मा.अंजुमजी शेख मॅडम यांनी मान्य करुन सदर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांना तशी सुचना दिली,अंधश्रद्धा,जादु टोणा,जात पंचायत, सामाजिक बहिष्कार बाबतीतील कलम व आवश्यक माहिती असणारे पुस्तकाबद्दल माहिती देऊन त्यांना पुस्तक भेट दिले व पोलिस कार्यालयातील लायब्ररी मध्ये अशी पुस्तके ठेवण्याची विनंती केली,पिडीत कुटुंबातील सदस्यांना राज्य सचिव माधव बावगे यांनी धिर देत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत असुन कायद्यापुढे कोणीही मोठा नाही असे म्हणाले तर सुरेश शेळके यांनी सांगितले की,या देशाच्या संविधानापेक्षा कोणी ही श्रेष्ठ नसुन कोणतीही जात पंचायत श्रेष्ठ नाही,गरज राहिल वास्तवतेची पिडीत कुटुंबातील एका सदस्यालाही पुस्तक भेट देऊन आत्तापर्यंतचे सोडा परंतु नवतरुणांनी तरी यापुढुन जात पंचायतीतील जाचक व अनारिष्ठ प्रथेच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे,मागास समाजातील असे काही स्वार्थी, राजकारणी लोक आहेत की ते रुढी परंपरा सोडायला तयार नाहीत,जात पंचायतीतील बहिष्कार अटीनुसार सामाजिक बहिष्कार,पंचायत समिती सदस्या समोर नग्न होऊन दिंड काढणे,सामुहिक बलात्कार,लघवी,विष्ठा खाणे अन्य अघोरी प्रकारच्या अटी व रोख रकमेची भरपाई असते,पिडीत कुटुंबातील सदस्यांनी अशा अनारिष्ठ अटी बाबतीत आम्हाला माहिती दिली,यावेळी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सचिव माधव बावगे,अब्दुल लतिफ,सिध्देश्वर बेलुरे,सुरेश शेळके, गणेश रानबा वाघमारे,अॅड.अजय वाघाळे,विजय गायकवाड अन्य इतर मान्यवर उपस्थित होते.