तोडकरी सरांच्या वर्षे श्रध्दा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

0

तोडकरी सरांच्या वर्षे श्रध्दा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

लोहारा   /  प्रतिनिधी 

लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील रहिवासी व संगीत एकच प्याला या नाटकातील सुधाकरची भुमिका बजावणारे  खलनायक व हनुमान जयंती  महोत्सवाचे आधारस्तंभ व सेवानिवृत्त शिक्षक सोमनाथ नागनाथ तोडकरी यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त बाबा चौरे महाराज यांची किर्तन रुपी सेवा आयोजित केली होती.  सोमनाथ तोडकरी सरांनी उंडरगावात महादेव मंदिर ,छत्रपती शिवाजी महाराज यांचा चबुत्रा ,नाटकांसाठी स्टेज, मंगल कार्यालय व समाजसेवा करीत पुढाकर घेऊन श्रमदानातून अनेक कामे  गाव वर्गणीतून पुर्ण केली. मरावे परी किर्ती रुपी उरावे ,जो आवडे देवाला तोची आवडे सर्वांना.या प्रमाणे लहाणापासून ते मोठ्यांपर्यंत नब्रतेने वागणारे तोडकरी आबांना एक वर्षे पूर्ण झाल्याने उंडरगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी चेतन महाराज,धनराज होनाळकर, भरत भुजंग  जाधव, अशोक नामदेव मुळे,बाळु गोविंद मूळे, दिलीप होनाळकर, उमाकांत जाधव, रमेश साखरे, नामदेव सुर्यवंशी, जगन्नाथ घोडके, राजेंद्र रवळे,भरत सुर्यवंशी, नाना सुर्यवंशी, तुकाराम जाधव, रंगनाथ ढोबळे,दतु  सुर्यवंशी, देवाप्पा बिराजदार, अशोक सुर्यवंशी, मुरलीधर मोरे, हणमंत रवळे, लक्ष्मण गंगणे, बाळु शिवकर आदींची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top