भाजपची पदयात्रा ही खरतर वास्तवात दिशाभूल पदयात्रा :- राष्ट्रवादी कोषाध्यक्ष जगदिश पाटील
उस्मानाबाद :- औसा विधानसभा मतदार संघाचे आ.अभिमन्यू पवार व तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सोयाबिनच्या अतिवृष्टीसाठी शासनाने मदत करावी म्हणून औसा ते तुळजापूर अशी पदयात्रा आयोजित केली आहे.वास्तवात शेतकऱ्यांवर १२ लाख टन सोयापेंड आयात करून ,खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करून ,सोयाबिन व्यापारांना स्टॉक लिमिट घालून १०००० रूपयावरचा भाव ५००० रू वर आणण्याचे शेतकरीद्रोही काम केंद्र सरकारने केले.प्रती क्विंटल ५००० रूपयाचा फटका देऊन शेतकऱ्यांप्रति खोटी सहानुभूती दाखवून पदयात्रा काढली जात आहे.महाराष्ट्र कोरोनाने आर्थिक संकटात असला तरी शासनाने १०००० कोटीचे पैकेज देऊन बळीराजाची दिवाळी सुखाची केलेली आहे,याच धर्तीवर केंद्राने मदत करायला हवी,केंद्रीय पथक लवकरात लवकर महाराष्ट्रात बोलावून केंद्राची मदत मिळवायला हवी,विमा कंपन्यावर दबाव वाढवून विमा दिवाळीपुर्वी कसा मिळेल यासाठी केंद्रातल्या सत्तेचा वापर करता येईल.हे करण्याची गरज असताना स्वतःच्या पक्षातल्या गटबाजीत आपलाच नंबर पहिला आहे हे दाखविण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे.काही दिवसापुर्वीच संभाजी निलंगेकरांनी अन्नत्यागाचा स्टंट केला होता,त्याला शह देण्यासाठी हा पदयात्रेचा स्टंट केला जात आहे.हे न समजन्या एवढा महाराष्ट्रातला शेतकरी अज्ञानी नाही.भारतीय जनता पार्टी हा शेतकरी विरोधी पक्ष आहे हे आता सिध्द झाले असून केवळ दिशाभूल करणे हाच त्यांचा अजेंडा आहे.सदरची पदयात्रा ही खरतर वास्तवात दिशाभूल पदयात्रा आहे.शेतकऱ्यांनी अशा ढोंगी लोकांपासून दूर रहावे. असे प्रसिद्धी पत्रक जगदिश पाटील , जिल्हा कोषाध्यक्ष ,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी ,उस्मानाबाद यांनी काढले आहेे .


