तलावाकाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त.

0

तलावाकाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त.

तुळजापूर , ( सांगवी (का) प्रतिनिधी ) :- 
सोलापूर तुळजापूर नॅशनल हायवे लगत असणाऱ्या सांगवी काटी माळुंब्रा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सध्या तो ओसंडून वाहत आहे. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यातून भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरला येत असतात. हा तलाव रोडलगत असल्यामुळे या तलावांमध्ये भाविक भक्त आंघोळ करण्यासाठी जात असतात तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असल्यामुळे त्यांना अचूक अंदाज न आल्यामुळे या अगोदर अनेक भाविक भक्तांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासन व तामलवाडी पोलिस स्टेशनच्या वतीने या तलावाकाठी पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे या तलावाकाठी प्रतिबंधित क्षेत्र असे फलक देखील प्रशासनाच्यावतीने लावण्यात आले आहेत.

आम्ही जिल्हा पोलीस प्रशासन व तामलवाडी पोलिस स्टेशनच्या वतीने दिवसरात्र या तलावाकाठी खडा पहारा देत असून कुठल्याही प्रकारे भाविक भक्तांना या तलावांमध्ये आंघोळीसाठी जाण्यापासून रोखण्यात येत आहे यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत अशी माहिती 
पोलिस काँ. राजेंद्र चौगुले , नागनाथ दुधाळ , नागनाथ मोटे , पो. हे कॉ सरगुले यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top