येडशीत साडे आकरा हजाराची देशी दारु जप्त : उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

येडशीत साडे आकरा हजाराची देशी दारु जप्त : उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 


उस्मानाबाद :-  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत येडशी येथे विना परवाना देशी दारु विक्री होत असल्याची माहीती मिळाली होती. बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती आधारे दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी उस्मानाबादच्या स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक घाडगे यांच्या मार्गदर्शना खाली धाड टाकण्यासाठी पथक नेमुन येडशी येथे सुरज गणपत पवार राहणार येडशी याच्यावर धाड टाकून त्याला देशी दारुच्या १९२ बाटल्या ११५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन त्याला ताब्यात घेऊन उस्मनाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात आक्रन्स.न.५३/२०२१ कलम ६५(ई)महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस नाईक डी. एम.लाव्हरेपाटील स्थानीक गुन्हे शाखा,उस्मानाबाद यांनी दिली आहे. आरोपी सुरज गणपत पवार याला अटक करण्यात आली आहे. यात देशी दारूच्या १९२ बाटल्या किंमत ६० रूपये प्रमाणे एकुण ११५२० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली या पथकात सहाय्यक पोलीस निरिक्षक शैलेश पवार ,पोलीस हेड काँन्टेबल ठाकुर, पोलीस हेड काँन्टेबल शेळके , 
पोलीस नाईक दिपक लाव्हरेपाटील , पोलीस काँन्टेबल गणेश सर्जे ,कोळी याचा समावेश होता. या स्थानीक गुन्हे शाखेच्या कारवाई मुळे येडशी परिसरातील अवैद्द धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top