महाराष्ट्र : 5 October: पुढच्या चार , पाच दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता. विजा चमकताना कृपया घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो. शक्यतो,अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर, संध्याकाळी व रात्री पर्यंत असते. IMD ने दिलेले इशारे पहा
गेल्या महिन्याचा शेवटचा आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.
त्यात अजून पुढील 4 , 5 दिवस जोरदार पावसाची
शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उस्मानाबाद , बीड , लातूर व अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाताला आलेले सोयाबीन पूर्णपणे नुकसान झालेले पाहायला मिळाले आहे . पिक विमा साठी पिक विमा कंपनीकडून विविध अटीमुळे अनेक शेतकरी पिक विमा पासून वंचित होत आहेत 72 तासाच्या आत मध्ये ऑनलाइन तक्रारी अनेक जण नोंदविता आला नाही त्यामुळे सरसगट मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी प्रशासनाकडून करत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पहावयास मिळाले आहे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मागील दोन दिवसा खाली उस्मानाबाद जिल्हा व लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची बांधावर जात पाहणी केली आहे व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मीडियाला दिली आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत मिळणार नाही तोपर्यंत सरकारला झोपू देणार नाही असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या फोटो पहा...