पारा शिवारातील मांजरा नदीत अनोळखी इसमाचे सडलेल्या अवस्तेत प्रेत सापडले

0

पारा शिवारातील मांजरा नदीत अनोळखी इसमाचे सडलेल्या अवस्तेत प्रेत सापडले.

वाशी :- तालुक्यातील पारा येथील पारा नांदूर रोड वरील मांजरा नदीच्या काठावर शिंदे यांच्या शेतात सडलेल्या अवस्तेत एक पुरुष जातींचे प्रेत सोमवार दि.18-10-2021 रोजी दुपारी 12.45 वाजता वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असेल शिंदे यांचा शेतालगत असलेल्या मांजरा नदी पत्राजवळ जयराम उद्धव तांदळे यांना आढळून आले.  

तांदळे यांनी तात्काळ वाशी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून वाशी पोलीस यांना माहिती कळविले. ताबडतोब वाशी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली, मृताची ओळख न पटल्यामुळे, पंचनामा करून प्राथमिक आरोग्य केंद्र ड्रॉ. अमर तांबडे यांनी शवविच्छेदन केले. 

अनोळखी प्रेत असल्यामुळे ग्रामपंचायत पारा यांनी या प्रेताचे दफन केले. यावेळी ग्रामसेवक प्रवीण देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी रामा काशीद, लोकरे, यावेळी उपस्थित होते. 

पुढील तपास पो. ज. मोहसीन खान पठाण, पो. नवनाथ सुरवसे हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top