ईद ए मिलाद निमित्त जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना पोलीस निरीक्षक बुधवंत यांच्या हस्ते फळ वाटप

0

ईद ए मिलाद निमित्त शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना पोलीस निरीक्षक बुधवंत यांच्या हस्ते फळ वाटप

उस्मानाबाद :- 19 ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या जश्ने ईद ए मिलाद निमित्त 13 ऑक्टोबर पासून उस्मानाबाद शहरांमध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आज 18 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ईद-ए-मिलाद कमिटीच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक बुधवंत यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले उपस्थित डॉ. सचिन देशमुख व डॉ. इस्माईल मुल्ला यांच्या हस्ते देखील फळ वाटप करण्यात आले.

यावेळी ईद-ए-मिलाद कमिटीचे अध्यक्ष हाफिज अफजल निजामी ,  हाफीज अस्लम , नगरसेवक बाबा मुजावर , माजी नगरसेवक खलील ( सर ) सय्यद , माजी नगरसेवक अफरोज पिरजादे , कादर पठाण , अझहर मुजावर , इर्शाद कुरेशी , कलिम कुरेशी , बिलाल तांबोळी , वाजिद पठाण , शाहनवाज सय्यद , आरेफ नाईकवाडी , इस्ताक कुरेशी , रहमत शेख , जावेद शेख , नेहाल शेख , पोलीस कॉस्टेबल बिरमवार उपस्थित होते.

19 ऑक्टोबर रोजी शहरात ईद ए मिलाद निमित्ताने ताज चौक दर्गा रोड , आझाद चौक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे व माळी गल्ली येथे रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती ईद ए मिलाद कमिटीच्या अध्यक्षांनी दिले आहे. व नागरिकांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहान देखील यावेळी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top