उस्मानाबाद जिल्ह्यातील स्थानिक आठवडी बाजार व जनावरांचे आठवडी बाजार नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु - जिल्हाधिकारी यांचे आदेश
उस्मानाबाद :- महाराष्ट्र शासनाच्या covid-19 च्या अनुषंगाने राज्यात जाहीर केलेल्या नियमावली नुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. राज्यातील कोबीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार व जिल्ह्यातील covid-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नवीन आदेश काढत जिल्ह्यातील स्थानिक आठवडी बाजार व जनावरांचे आठवडी बाजार 'नियंत्रित' स्वरुपात पुन्हा सुरु करण्याचे आदेश काढले आहेत यामध्ये विविध सूचनांचे पालन करत आठवडी बाजार सुरू करण्याचे आदेश 25 ऑक्टोबर 2021 रोजी काढले आहेत
50% क्षमतेत बाजार भरविणे , मास्क वापरणे , लसीकरण बाबत जनजागृती करणे व विविध मार्गदर्शन सुचना करत आठवणी व जनावरांच्या आठवडी बाजारास परवानगी देण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकारी यांनी काढलेले आधिसुचना खाली देण्यात आले आहे.
उस्मानाबाद शहरात भरविण्यात येणारा रविवार चा आठवडी बाजार देखील सुरू करण्यात आल्या बाबत उस्मानाबाद नगरपालिकेच्या वतीने शहरांमध्ये रिक्षावर याबाबत नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना माहिती देण्यात आली आहे
.................................................
Ad
.................................................