उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल 

मुरुम पोलीस ठाणे : चिंचोली (भु.) येथील अशोक पवार यांनी त्यांच्या गावातील शेत गोठ्यासमोर बांधलेला बैल दि. 29- 30.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या अशोक पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

नळदुर्ग पोलीस ठाणे : कुनसावळी, ता. तुळजापूर येथील श्रीकांत कोकरे यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात ठेवलेल्या 5 शेळ्या व 2 कोकरे दि. 29- 30.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या कोरके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

उस्मानाबाद (श.) पोलीस ठाणे : बेंबळी येथील कलीम शेख यांनी दि. 28.10.2021 रोजी 06.30 ते 09.45 वा. दरम्यान उस्मानाबाद येथील ताजमहाल चित्र मंदीराजवळील झाडाखाली त्यांची इनोव्हा कार क्र. एम.एच. 21 व्ही 7608 ही लावली असता अज्ञाताने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या शेख यांनी दि. 30.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

बेंबळी पोलीस ठाणे : सुंभा, ता. उस्मानाबाद येथील दत्तात्रय गायकवाड यांच्या कापड दुकानाचा व शिवाजी देवकते यांच्या घराचा कडी- कोयंडा दि. 29- 30.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने तोडून गायकवाड यांच्या दुकानातील 40,000 ₹ किंमतीच्या साड्या, रेडीमेड कपडे व रोख रक्कम 50,000 ₹ तर देवकते यांच्या घरातील अंदाजे 15 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 16,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top