हाच आमचा सर्वधर्म समभाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षी मुस्लिम बांधवांकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर....!
उस्मानाबाद :- विजयादशमी निमित्त शहरातील धारासुर मर्दिनी देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणुन दुचाकी व चारचाकी गाडी पार्किंग ची मोफत नियोजनबध्द व्यवस्था युनीटी फाउंडेशन पुढाकाराने मुस्लिम समाजातर्फे ईदगाहच्या पवित्र मैदानात करण्यात आली होती .
सामाजीक एकतेच्या या कार्यासाठी पोलीस प्रशासन व हिंदु बांधवांतर्फे समस्त मुस्लिम समाजाचे आभार व्यक्त करण्यात आले. दोन वर्षापुर्वीही युनीटी फाऊंडेशन या सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन मंदिरला येणार्या भावीकांना कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणुन अशा प्रकारेच ईदगाह मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली होती त्यावेळेस पोलीस निरिक्षक मा. कस्तुरे साहेब यांनी शहर पोलीस स्टेशन येथे भव्य सत्कार केला होता .या समाजिक एकतेच्या कार्यात सय्यद शाहनवाज़ , सद्दाम मुजा़वर , अजी़म सरकार , ईरशाद सय्यद ,अतिक शेख, जमशेद शेख , मुन्ना मोमीन, व ईतर 10 ते 15 स्वयंसेवकांनी रात्री ऊशीरा पर्यंत व्यवस्था पार पाडल्य़ाने मुस्लिम समाजाचे शहरभरात कौतुक होत आहे. शाहनवाज़ सय्यद व सद्दाम मुजावर हे सुशिक्षीत तरुण वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातुन समाजिक एकतेसाठी सदैव तत्पर असल्याने शहरभरात कौतुक होत आहे.