डॉ.पद्मसिंह पाटील शाळेत कोविड लसीकरण सत्राचे आयोजन २५२ लाभार्थ्यांनी घेतला लसीकरणाचा लाभ
उस्मानाबाद :- डॉ पदमसिंह पाटील विद्यामंदिर शाळेत उस्मानाबाद जिल्हा समाज सेवा मंडळाचे संस्थापक सचिव तथा भाजपा नेते पांडुरंग लाटे आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक २ रामनगर उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण सत्राचे आयोजन आज दिनांक १४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते या लसीकरण मोहिमेत २५२ जणांनी सहभाग नोंदवत लसीकरण केले.
वासुदेव गल्ली व लमाण तांडा भागातील नागरिकांना लसीकरणाबाबत पांडुरंग लाटे यांनी जनजागृती करून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले व निअर टू होम योजनेअंतर्गत बोंबले हनुमान परिसर उंबरे कोटा वासुदेव गल्ली व लमान तांडा येथील जनतेसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर उस्मानाबाद येथील वैद्यकीय अधिकारी अनुराधा लोखंडे - बुर्ले यांच्या मदतीने व भाजपा नेते पांडुरंग लाटे यांच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली यावेळी पद्मसिंह पाटील शाळेचे मुख्याध्यापक अमरनाथ केवळराम प्रीतम मुंडे संदीप इंगळे सुनील पंगुडवाले यांचे या लसीकरण मोहीमेस मोलाचे सहकार्य लाभले