ईद-ए-मिलाद या शुभ दिना निमित्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर , आमदार कैलास पाटील व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या हस्ते रक्तदान शिबिर व लसीकरणाचे उद्घाटन

0

ईद-ए-मिलाद या शुभ दिना निमित्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ,  आमदार कैलास पाटील व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या हस्ते रक्तदान शिबिर व लसीकरणाचे उद्घाटन


उस्मानाबाद :- शहरात ईद-ए-मिलाद या शुभ दिनाच्या मुहूर्तावर आमदार कैलास पाटील , 
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या शुभ हस्ते रक्तदान शिबिर व लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आझाद चौक येथे करण्यात आले. 

आझाद ग्रुप आयोजित रक्तदान शिबिर व लसीकरण मोठ्या उत्साहात सुरुवात झाली व मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी लसीकरण करून घेतले आहे व अनेक रक्तदात्यांनी याठिकाणी रक्तदान केले आहे यावेळी आमदार  कैलास पाटील , आझाद ग्रुपचे सदस्य तथा नगरसेवक खलिफा कुरेशी , कलीम कुरेशी , मुनीर कुरेशी , शुकुर कुरेशी , सय्यद मुजमिल , गफार कुरेशी , शेख बारी , मिलाद कमिटीचे अध्यक्ष अफजल निजामी , राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मसुद शेख, संजय निंबाळकर , जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर , शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पु मुंडे , नगराध्यक्ष मंकरद राजे निबाळकर , काँग्रेस पक्षाचे उमेश निंबाळकर , नगरसेवक बाबा मुजावर , राजाभाऊ शेरखाने , डॉ. प्रतापसिंह पाटील , कादर खान , शहर पोलिस निरीक्षक बुधवंत , डॉ. शकिल खान , आयाज (बबलु )शेख , बिलाल तांबोळी, अफरोज पिरजादे , वाजिद पठाण , मौलाना जाफर , नंदकुमार गवारे , पंकज पाटील , शहेबाज कुरेशी , महेबुब मुजावर , आजाद ग्रुपचे सदस्य व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


छाया राहुल कोरे आळणीकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top