स्व.पवनराजे निंबाळकर खुन खटल्यात डॉ. पद्मसिंह पाटील यांना हजर राहण्याचे आदेश!
उस्मानाबाद :- दि. 08/10/2021 : दिनांक 03/06/2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांचा कळंबोली येथे खुन झाला होता. सदर प्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सह इतर 9 जनांवर CBI मार्फत गुन्हा दााखल होवून दोषारोप पत्र ही दाखल झाले. व सदर खटला मुंबई येथील सत्र न्यायालयात चालू आहे. सदर प्रकरणातील आरोपी क्र. 4 पारसमल ताराचंद बदाला जैन याने न्यायालयात माफीचा साक्षीदार म्हणुन साक्ष देण्यासाठी अर्ज सादर केला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने मंजुर केल्यानंतर मागील बऱ्याच तारखेपासून सदर माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांची मुंबईतील सत्र न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली. दि. 06/10/2021 रोजी सदर खटल्यामध्ये तारीख नेमलेली होती सदर दिवशी सदर माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांनी सर्व आरोपेी यांचे ओळख न्यायालयास पटवून दिली परंतु त्यावेळी आरोपी नं. 1 डॉ. पद्मसिंह पाटील हे गैरहजर होते. त्यांच्या वकीलांनी डॉ. पद्मसिंह पाटील आजारी असल्याचे कारण पुढे करत ते खटल्यात हजर राहू शकत नाहीत त्यामुळे मुदत मागीतली त्यावेळी सदर प्रकरणातील फिर्यादी श्रीमती आनंदीदेवी भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी सदर खटल्यात नेमलेल्या खाजगी वकीलांनी डॉ. पद्मसिंह पाटील हे आजारी नसून ते अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणीकरीता विविध ठिकाणी हजर असल्याचे तसेच विविध कार्यक्रमात हजेरी लावत असल्याचे फेसबुक पोस्टद्वारे दिसून येत आहे. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले. सदरचा खटला हा माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांचेकडून डॉ. पद्मसिंह पाटील यांची ओळख पटविणेकरीता नेमलेले असताना डॉ. पद्मसिंह पाटील आजारी असल्याचे कारण दाखवून न्यायालयात हजर राहण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास आले. डॉ. पद्मसिंह पाटील यांची उपस्थिती सदर खटल्यात अनिवार्य असल्याने दि. 06/10/2021 रोजी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वतीने कोर्टात हजर राहण्यास मुदत मिळण्याच्या अर्जावर मा. सत्र न्यायालय मुंबई यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी येणाऱ्या पुढील तारखेस म्हणजेच दि. 13/10/2021 रोजी हजर रहावे अन्यथा अटक वारंट काढण्यात येईल असा आदेश केला. त्यामुळे सदर पवनराजे निंबाळकर खुन खटल्यातील आरोपी पारसमल जैन याने खुनाची सुपारी घेतल्याचा आरोप याच्यावर आहे. व तोच आरोपी सदर प्रकरणात माफीचा साक्षीदार होवून त्याने सदर प्रकरणात सविस्तरपणे साक्ष नोंदवून आरोपीची ओळख ही न्यायालयास पटवुन दिली आहे. म्हणुन सदर प्रकरणात लवकरच निर्ण होण्याची शक्यता दिसून येत आहे.