शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी बचतगटांनी नागरिकांमध्ये जागृती करावी : नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचे आवाहन

0



शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी बचतगटांनी नागरिकांमध्ये जागृती करावी : नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचे आवाहन 

सोलापूर येथील क्षेत्रीयलोक संपर्क ब्युरोचा उपक्रम

 

उस्मानाबाद,दि.28(जिमाका):-शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी बचतगटांनी आपल्‍या स्‍वत:पासूनसुका कचरा व ओला कचरा वेगळा जमा करण्‍याची सुरुवात करुन नागरिकांमध्ये जागृती व कर्तव्याची जाणीव करुन दयावी असे आवाहन तुळजापुर नगरपरिषदचे  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनीकेले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो आणि नगरपरिषद तुळजापुर यांच्‍यावतीने नगर परिषद च्या सराया धर्माशाळेच्या हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन शहरी २.० विशेष प्रचार कार्यक्रमात श्री रोचकरी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष गणेश कदम, नगरसेवक नानासाहेब लोंढे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, समाजतज्ञ रमाकांत गायकवाड,निवृत्त अधिकारी सतीश घोड़के, अमरावती येथील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरोचे सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव,नगर परिषदचे कार्यालय अधीक्षक वैभव पाठक, राष्‍ट्रीय नागरी उपजीविका प्रकल्‍पाच्‍या सहायक प्रकल्‍प अधिकारी महजबीन शेखआदि मान्यवर उपस्थित होते.

श्री गायकवाड म्हणाले, स्वच्छ भारत मिशन शहरी २.० मोहीममध्ये प्रत्येक शहराना  घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करावी लागणार आहे. प्रामुख्याने ही योजना ट्रिपल आरशी संबंधित आहे. यामध्ये रिड्यूजरियूज आणि रिसायकल समाविष्ठ आहे. यामुळे कचऱ्याचे शास्त्रीय आधारावर विघटन केल्यास हे ध्येय साध्य करण्यात यश मिळू शकते. हे मिशन पूर्णपणे पेपरलेस आहे आणि देशातील सर्व राज्ये आणि स्थानिक शहरी संस्थांनी डिजिटल आधारावर मंजूर केले आहे. याप्रसंगी श्री सतीश घोड़के आणि गुलाबचंद व्यवहारे यानी आपले मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत श्री अंकुश चव्हाण म्हणाले स्वच्छ भारत मिशन शहरी २.० मोहीमेत लोकामध्ये स्वछतेविषयीजागरूकता निर्माण करणे, एकेरी वापरल्या जाणा-या प्लास्टिक कचरा देश भरातून लोक सहभागाद्वारे स्वच्छ करणे  आणि ३१ ऑक्टोंबरपर्यंत देशभरातून ७५ लाख किलो कचा-याचे संकलन करून त्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्‍याचे ध्येय निश्चित केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दीप प्रज्वलनने करण्यात आली.  ३१ ऑक्टोंबर रोजी साजरा केली जाणारीसरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त मान्यवरासह उपस्थितीत लोकाना राष्ट्रीय एकात्मेतेची शपथ देण्यात आली.याप्रसंगी महिला बचत गट आणि नेहरू युवा केंद्राच्या सहायने धर्मशाळेच्या परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वच्छता विषयावर चित्रकला स्पर्धा आणि उपस्थित महिलासाठी प्रश्न मंजूषा स्पर्धा घेण्यात आली होती. चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या नगर परिषद प्राथमिक शाळा क्र ३, श्रीतुळजाभवानी सैनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिजामाता कन्या माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद कन्या प्रशाला इत्यादी शाळेतील २१ विद्यार्थ्यना आणि ४ प्रश्न मंजूषा स्पर्धेतील विजेत्याना मान्यवराच्या हस्ते बक्षीस देऊन सम्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास यादव यानी केले. वैभव पाठक यानी आभार मानले.

यावेळी कार्यक्रमसाठीनवनिर्मित महिला संस्थेच्या अध्यक्षा मीना सोमाजी, राष्ट्रतेज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुलाबचंद व्यवहारे,अष्टविनायक बहुदेशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास कदम, जिजामाता प्रतिष्ठानचे सचिव महेश चोपदार,नेहरू युवा केंद्राचे वैभव लांडगे,जब्बार हनूरे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top