7 घरफोडीतील 91 ग्रॅम सोन्याचे दागिने सह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात : 91 grams of gold jewelry...
उस्मानाबाद :- दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी गोपनीय खबरेच्या आधारे ताब्यात घेऊन आरोपी सुरज दिपक शिंदे रा.हंगरगापाटी तालुका तुळजापुर याच्याकडे गुन्हे अनुषंगाने तपास करून त्याने व इतर साथीदार यांनी मिळून पोस्टे नळदुर्ग, तुळजापूर, लोहारा हददीत एकूण 07 गुन्हे केल्याची कबुली दिल्या वरून गून्हयातील मुद्देमाल जप्त करून एकूण 07 गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले.
त्याच्या ताब्यात 91 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आदाजे किंमत 2,31,195/- रुपयाचा मुद्देमाल आढळल्याने त्या बाबत तो सविस्तर माहिती देउ शकला नाही. पोलीसांनी अभिलेख अभ्यासले असता पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्हे पोस्टे नळदुर्ग 234/2021 कलम 457,380 भादवी , पोस्टे नळदुर्ग गुरनं. 235/2021 कलम 457, 380 भादवी, नळदुर्ग गुरनं. 324/2021 कलम 454,457,380 भादवी, पोस्टे नळदुर्ग गुरनं. 325/2021 कलम 457, 380 भादवी, पोस्टे लोहारा गुरनं. 144/2021 कलम 458, 380,34 भादवी, पोस्टे लोहारा. 183/2021 कलम 454,380 भादवी, तुळजापूर गुरनं. 286/2021 कलम 457,380 भादवी, या प्रमाणे दाखल आहेत.
हि कारवाई पोलिस निरिक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सह पोलिस निरिक्षक शैलेश पवार ,
पोलिस उपनिरिक्षक माने ,पोलिस नाईक हुसेन सय्यद , अमोल चव्हाण , पोलिस कॉस्टेबल बबन जाधवर , योगेश कोळी , अविनाश मरलापल्ले , रवी आरसेवाड , चालक पोलिस कॉस्टेबल आनंद गोरे यांनी पुर्ण केली आहे