युगंधर डॉ.आंबेडकरांची धुरंधर धम्मचक्र प्रवर्तन पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

0

युगंधर डॉ.आंबेडकरांची धुरंधर धम्मचक्र प्रवर्तन  पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

प्रा शिरीष कांबळे लिखित

उमरगा (महादेव पाटील)

 साहित्य क्षेत्राच्या पटलावरील  परिचित असलेल्या प्रा शिरीष कांबळे 
यांनी  लिहिलेल्या 'युगंधर डॉ.आंबेडकरांची धुरंधर धम्मचक्र प्रवर्तन यात्रा ' या पुस्तकाचा प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक व पुरोगामी विचारवंत डॉ सुरेश वाघमारे, केंद्रीय उपाध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष कैलास शिंदे, शिवमूर्ती भांडेकर,  डॉ मन्मथ माळी, अरुण जाधव  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दिलीप  गरुड आदी मान्यवर उपस्थित होते.
 

कार्यक्रमात लेखक प्रा शिरीष कांबळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.त्यानंतर 'युगंधर डॉ.आंबेडकरांची धुरंधर धम्मचक्र प्रवर्तन यात्रा'या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी योगा क्षेत्रातील प्राविण्य मिळवलेले रुद्रा बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला.
   मराठवाडा साहित्य परिषद शाखा उमरगा तसेच कांबळे मित्रपरिवारराच्या वतीने पुस्तकांचे प्रकाशन सोहळा बुधवार (दि. ६) रोजी कैलास शिंदे मंगल कार्यालय मध्ये पार पडला. डॉ सुरेश वाघमारे या पुस्तकाविषयी गौरवोद्गार काढत हे पुस्तक इतिहास घडवत अनेकांना सकारात्मक प्रेरणा देईल.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दिलीप गरुड, जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष कैलास शिंदे, शिवमूर्ती भांडेकर,  डॉ मन्मथ माळी, अरुण जाधव प्रमुख उपस्थिती होती.
  कार्यक्रम आयोजन मराठवाडा साहित्य परिषद उमरगा माजी सभापती हरीश डावरे, कमलाकर भोसले, शिवनांद दळगडे,सुभाष वैरागकर,शरद कांबळे, वजीर शेख, रजत कांबळे व कांबळे मित्र परिवार यांनी आयोजन केले होते. प्रास्तविक किरण सगर व सूत्रसंचालन सुधीर कांबळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top