शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूरातील दारु दुकाने 7, 15 आणि 19 ऑक्टोबर रोजी बंद

0

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूरातील दारु दुकाने 7, 15 आणि 19 ऑक्टोबर रोजी बंद
 
उस्मानाबाद,दि.06(जिमाका):- 
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे दि. 07 ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत श्री.तुळजाभवानी शारदीय महोत्सव होणार आहे. या कालावधीत तुळजापूर शहरातील कायदा आणि सुव्यसस्था अबाधित राहण्यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अन्वये नियमाचा वापर करुन घटस्थापना दि. 07 ऑक्टोबर, होमवर विधी दि. 15 ऑक्टोबर आणि कोजागिरी पौर्णिमा दि. 19 ऑक्टोबर 2021 या दिवशी तुळजापूर शहरातील (स्थानिक) सर्व देशी, विदेशी, बिअर बार, परमिट रुम, एफएलबिआर-दोन, आणि एफएल-चार आदी अबकारी अनुज्ञप्त्या (दारु दुकाने) बंद ठेवण्याचे आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top