उस्मानाबाद ः शेतकर्यांना त्वरीत सरसकट विमा मिळावा, यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीविरोधात शुक्रवारी (दि.26) सकाळी 10 वाजता उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेतकर्यांची जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजय पाटील दुधगावकर यांनी केले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीकडून करण्यात आले होते. परंतू आजपर्यंत बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीने शेतकर्यांना विमा मंजूर केलेला नाही. मागील वर्षाच्या विम्याची राहिलेली रक्कम आजपर्यंत शेतकर्यांना दिलेली नाही. शेतकर्यांकडून विमा कंपनीच्या प्रतिनिधीने घेतलेल्या पैशाच्या विरुध्द फौजदारी खटले दाखल केलेले नाहीत. सदर विमा कंपनी काळ्या यादीत टाकावी, यासाठी शुक्रवारी (दि.26) सकाळी 10 वाजता येडशी येथे राष्ट्रीय महामार्गावर हा रस्ता रोको करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केले आहे.