भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण; गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू!

0

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण; गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू!


उस्मानाबाद शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या शेजारी असलेलल्या वडार गल्ली येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या समाजसेवक  तरुणास भांडण करणाऱ्या व्यक्तींनी मारहाण केली होती. मारहाण झालेल्या तरुणावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दि 22 नोव्हेंबर रोजी सकाळी त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 

याबाबत अधिक माहिती अशी की उस्मानाबाद शहरातील मदिना चौक येथील मोहसीन शेरखान पठाण हा तरुण वडार गल्ली येथे सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेला होता. मात्र तेथील भांडण करणाऱ्या व्यक्तींनी मोहसीन शेरखान पठाण यास लोखंडी गंज व दगडाने मारहाण केली, त्यामुळे मोहसिन शेरखान पठाण यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याला सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज दि .22 नोव्हेंबर रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाले व उस्मानाबाद शहरातील मुस्लिम दफनभूमी येथे त्याचा अंत्यविधी करण्यात आली आहे!


शहरातील ख्वाजा नगर येथील मोहसीन पठाण या तरुणाचा आज पहाटे उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समाज माध्यमावर पसरली व तरुणाच्या निधनाने उस्मानाबाद शहरात शोककळा पसरली. शहरातील खाजानगर , मदिना चौक या भागातील नागरिकांनी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दुकाने बंद ठेवली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top