उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी मारहान गुन्हे दाखल

0



उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी मारहान गुन्हे दाखल 

नळदुर्ग पोलीस ठाणे : शेतातील पाईप लाईन फोडल्याचा जाब सलगरा (मड्डी), ता. तुळजापूर ग्रामस्थ- सचिन विठ्ठल मोरे यांनी दि. 20.11.2021 रोजी 11.00 वा. सु. सलगरा (मड्डी) येथील त्यांच्या शेतात भाऊबंद- सुभाष जनार्धन मोरे, सखाराम सुभाष मोरे, सुमन सुभाष मोरे यांना विचारला असता त्यांनी चिउूनजाउन सचिन मोरे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळई, काठीने मारहान करुन सचिन यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या सचिन मोरे यांनी दि. 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी पोलीस ठाणे : भुखंड वाटणीच्या कारणावरुन शेलगाव, ता. वाशी येथील बबन अंकुश शिंदे यांनी दि. 17.11.2021 रोजी 16.00 वा. सु. ग्रामस्थ- मुरलीधर भगवान खरात यांना त्यांच्या दुकानासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. यात मुरलीधर यांच्या उजव्या हाताचा अंगठ्याचे हाड मोडून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या मुरलीधर खरात यांनी दि. 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

येरमाळा पोलीस ठाणे : घरगुती विज जोडणी तोडल्याच्या कारणावरुन तेरखेडा, ता. वाशी येथील उकरंडे कुटूंबातील कल्याण, बालाजी, रंभा, शारदा, अमृता, प्रसाद उकरंडे या सर्वांनी दि. 20.11.2021 रोजी 20.35 वा. सु. ग्रामस्थ- धनश्री राजेंद्र मगर यांनासह त्यांची आई- तारामती यांना त्यांच्या घरासमोर जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. अशा मजकुराच्या धनश्री मगर यांनी दि. 21 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 323 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top