लोकसेवकास धाकदपटशा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : गावसूद येथील मंदिरासमोर दि. 16.11.2021 रोजी 19.30 वा. ग्रामसभा सुरू होती. यावेळी ग्रामस्थ- शाम तेरकर, संपत गायकवाड, सुधीर गायकवाड, प्रदीप तेरकर, अजय तेरकर, आकाश तेरकर, संतोष भोसले, सोमेश्वर तेरकर, महेश तेरकर या 8 व्यक्तींनी तंटामुक्ती अध्यक्षाच्या निवडीवरुन सभेत गोंधळ घालून ग्रामसभा घेण्यास संरपंच- श्रीमती महानंदा सगर यांना मज्जाव केला. यावर सरपंच- सगर यांनी ग्रामसेवकास सभा तहकुब करण्यास सांगीतले परंतु ग्रामसेवकाने सभा तहकुब केली नाही. यानंतर नमूद लोकांनी उपसरपंच- श्रीमती मंगल भोसले, पंच- लता पेठे यांसह ग्रामस्थ- गणेश सगर यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे नमूद लोकांनी सरपंचाच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा आणला. अशा मजकुराच्या सरपंच- श्रीमती महानंदा सगर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 186, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.