व्हाट्सॲप गटात महिलेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल
उस्मानाबाद जिल्हा : तुळजापूर तालूक्यातील एका व्यक्तीने गावातीलच एका महिलेचा नामोल्लेख करुन ही महिला फक्त 500 ₹ मध्ये धंदा करत असून तीचा प्रियकर तिला ग्राहक शोधून देत आहे. असा बदनामी कारक मजकुर असलेला संदेश गावातील 3 व्हाट्सॲप गटात दि. 16.11.2021 रोजी प्रसारीत केला. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेच्या पतीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 500, 501 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 67 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.