google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 तालुक्यातील १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे दुसरे आरोग्य वर्धिनी केन्द्र - लोहारा खुर्द

तालुक्यातील १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे दुसरे आरोग्य वर्धिनी केन्द्र - लोहारा खुर्द

0

तालुक्यातील १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे दुसरे आरोग्य वर्धिनी केन्द्र - लोहारा खुर्द


लोहारा/प्रतिनिधी
  प्राथमिक आरोग्य केंद्र, कानेगाव अंतर्गत येणारे लोहारा (खुर्द) उपकेंद्र (आरोग्य वर्धीनी केंद्र) येथील आज दिनांक १९/११/२०२१ रोजी १८ वर्षांवरील सर्व पात्र लाभार्थींना कोविड लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. लोहारा (खुर्द), आरोग्य वर्धिनी केन्द्र अंतर्गत तीन गावांचा समावेश होतो, लोहारा (खुर्द), मोघा (खुर्द), मोघा (बुद्रुक), लोहारा (खुर्द) येथील एकूण ९००, मोघा (खुर्द), येथील ४४८ तर मोघा (बुद्रुक) येथील एकूण ४५०, १८ वर्षांवरील पात्र लाभार्थींना लसीकरण करण्यात  आले. लोहारा (खुर्द), आरोग्य वर्धिनी केंद्र येथील आरोग्य विभागातील टीम सदस्य समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली शिंदे, आरोग्य सेविका काळे जी.एस., आरोग्य सेवक श्री जवादे एस. आर., अर्धवेळ परिचर छाया पवार, आशा स्वयंसेविका मनिषा इंगळे, जिजाबाई गोरे, पद्मिनी जाधव,हअनिता बाबले, लक्ष्मी रसाळ यांनी मिशन कवच कुंडल तरच हर घर दस्तक अंतर्गत नियमित सत्र तसेच मोबाईल टीम द्वारे नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. लोहारा (खुर्द) येथील सरपंच सचिन रसाळ, ग्रामसेवक कोकाटे जी. डी., पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी रोहन जमादार यांनी घरोघरी आरोग्य टीम सोबत फिरून लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच मोघा बुद्रूक व मोघा खुर्द येथील सरपंच सचिन गोरे व ग्रामसेवक कदम एम.व्ही यांचे सहकार्य लाभले. प्राथमिक आरोग्य केंद्र, कानेगाव येथील वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रियंका बंदिछोडे यांनी मोबाईल टीम उपलब्ध करून देत क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या टीमला प्रोत्साहन दिले. तसेच स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथील प्रकल्प अधिकारी मा रमाकांत जोशी सर यांनी त्यांची मोबाईल टीम पाठवून जनजागृती तसेच लसीकरण करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच हॅलो मेडिकल फाऊंडेशन, NSE फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा लसीकरनाबाबत जनजागृती करण्यासाठी श्रम घेतले. दिनांक १९ नोव्हेंबर रोजी पर्यंत लोहारा तालुक्यातील एकूण आठ गावातील १००% पात्र लाभार्थींना लस (पहिला डोस) देण्यात आली असून यात आरनी, नागराळ (लोहारा नागराळ),  कास्ती खुर्द, बेंडकाळ, मोघा बुद्रूक व खुर्द, सालेगाव, लोहारा खुर्द या गावांचा समावेश आहे. लोहारा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठित नागरिक यांचा सक्रिय सहभाग मिळाला तर या महिनाअखेर तालुक्यातील पहिल्या डोसचे १००% लसीकरण पूर्ण होईल ...... डॉ.अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी, लोहारा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top