तालुक्यातील १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले आरोग्य वर्धिनी केन्द्र - सालेगाव

0

तालुक्यातील १००% नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले आरोग्य वर्धिनी केन्द्र - सालेगाव

लोहारा/प्रतिनिधी
प्राथमिक आरोग्य केंद्र, माकणी अंतर्गत येणारे सालेगाव उपकेंद्र (आरोग्य वर्धीनी केंद्र) येथील काल दिनांक १८ नोव्हेंबर रोजी १८ वर्षांवरील सर्व पात्र लाभार्थींना कोविड लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. सालेगाव, आरोग्य वर्धिनी केन्द्र अंतर्गत दोन गावांचा समावेश होतो, दक्षिण सालेगाव, उत्तर सालेगाव. येथील एकूण १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या २३५७ असून सर्व पात्र लाभार्थींना लसीकरण करण्यात  आले. सालेगाव, आरोग्य वर्धिनी केंद्र येथील आरोग्य विभागातील टीम सदस्य समुदाय आरोग्य अधिकारी डॉ संदीप बनसोडे, आरोग्य सेविका कोमल भालेराव, आरोग्य सहाय्यक श्री विजयकुमार हळीखेडकर, आरोग्य सेवक श्री गणेश लुल्ले, अर्धवेळ परिचर मंगल कांबळे, आशा स्वयंसेविका लतिका साळुंके, स्मिता भालेराव यांनी मिशन कवच कुंडल तरच हर घर दस्तक अंतर्गत नियमित सत्र तसेच मोबाईल टीम द्वारे नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले.  मौजे सालेगाव येथील सरपंच नारायण गुरव, ग्रामसेवक भोरे एन.बी., पोलिस पाटील बालाजी मातोडे, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी बबन बाबर, ग्रामपंचायत मधील डाटा एन्ट्री ऑपरेटर अमोल कांबळे यांनी घरोघरी आरोग्य टीम सोबत फिरून लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्र, माकणी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. रोहिणी महादवाड, डॉ प्रगती शिंदे यांनी मोबाईल टीम उपलब्ध करून देत क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या टीमला प्रोत्साहन दिले. तसेच स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथील प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी सर यांनी त्यांची मोबाईल टीम पाठवून जनजागृती तसेच लसीकरण करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच हॅलो मेडिकल फाऊंडेशन, NSE फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा लसीकरनाबाबत जनजागृती करण्यासाठी श्रम घेतले. सर्वांच्या लसीकरनासाठी, सर्वांचा सहभाग आवश्यक आहे ...... डॉ.अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी, लोहारा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top