शेतकऱ्याने चक्क गांजा किंवा अफु लावायची
जिल्हाधिकारी यांच्याकडे अजब मागणी
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे अजब मागणी म्हणे गांजा किंवा अफु लागवडीची परवानगी दया लोहारा तालुक्यातील महेश वसंतराव कदम या तरुण शेतकऱ्याने कोरडभुई शेती करायला चालु केली पण शेतात पाणी नसल्यामुळे पिक येत नाही म्हणुन कृषी विभागाकडे पोकरा अंतर्गत विहिरीसाठी अर्ज केला सुरुवातीला स्वःताचे भांडवल घाला नंतर आम्ही अनुदान देवु असे सांगण्यात आले अशी माहिती महेश यांनी दिली.
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी या मुळे नेहमी अडचणीत आलाय बर ज्यांची कोरडभुई आहे त्यांची पाणी नसल्यामुळे पिकत नाही पिकल तर विकत नाही अश्या आस्मानी संकटात जिल्ह्यातील अनेक शेतकरी सापडले आहेत.
सोयाबीनला भाव चांगला मिळेल म्हणुन सोयाबीन केले पण सोयाबीनला भाव मिळाला नाही १० हजार रुपये क्विंटलचा सोयाबीन ५/६ हजार रुपये झाला पेरणी , काढणी , भरडणे , फवारणी यातच पैसे जास्त जाते मग शेतकऱ्याकडे शिल्लक काहीच राहत नाही मी इतर शेतकऱ्या प्रमाणे आत्महत्या करणार नाही मी सावकाराकडुन व्याजाने पैसे घेणार नाही मला फक्त " गांजा किंवा अफु " लागवडीची परवानगी दया अशी अजब मागणी उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनद्वारे महेश वसंतराव कदम यांनी केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यतील शेतकऱ्यांना 2020 व 21 मधील पिक विमा मिळाला नाही त्यामुळे शेतकरी विम्याचे पैसे भरून देखील विविध समस्यांशी सामना करत आहेत जिल्ह्यात पिक विमा कंपनीच्या अनेक प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडून फोनपे वर पैसे घेऊन पंचनामे केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत