google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 तरुणांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवावा - शरण पाटील

तरुणांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवावा - शरण पाटील

0

तरुणांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवावा - शरण पाटील


पुर्ण पत्रकार परिषद ...





 उस्मानाबाद (प्रतिनिधी) १२ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर पर्यंत राज्यातील सर्व तरुणाने सभासदांची नोंदणी करून जास्तीत जास्त सदस्य आपल्या राज्यातून नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.राहुल गांधी यांच्या माध्यमातून प्रत्येक युवकांना काँग्रेसच्या विचारांची या संघटने मध्ये सामील करून घेण्यासाठी आमच्या संघटनेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत.सर्व तरुणांनी पुढे येऊन सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्षपदासाठी चे उमेदवार शरण पाटील यांनी आज दिनांक १६ नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले


       पुढे बोलताना पाटील म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून युवक काँग्रेसचा जो आवाज आहे तो केंद्रातील भाजपा सरकार मध्ये आवाज उठविणे महाराष्ट्रातील युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार देणे नगरपालिका जिल्हा परिषद त्याच बरोबर आरोग्याचा प्रश्न त्या त्या जिल्ह्यांमध्ये प्रश्न सोडविणार आहोत

   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषिमंत्री यांच्यामार्फत मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईची मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असून पीक विम्यासाठी देखील लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, महासचिव पदासाठी असलेले उमेदवार अभिजीत बाबुराव चव्हाण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top