बुथ तेथे उद्योजक निर्माण करण्यासाठी नव उद्योजकांचा मेळावा उमरगा येथील कैलास दादा शिंदे मंगल कार्यालयात संपन्न
लोहारा/प्रतिनिधी
आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून बुथ तेथे उद्योजक निर्माण करण्यासाठी नव उद्योजकांचा मेळावा उमरगा येथील कैलास दादा शिंदे मंगल कार्यालयात दि. 26 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी व जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा येथील कैलास दादा शिंदे मंगल कार्यालयात बुथ तेथे उद्योजक निर्माण करण्यासाठी नव उद्योजकांचा मेळावा घेण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संताजी काका चालुक्य पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास दादा शिंदे, जि.प.समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे शुशांत भुमकर, प्रा.किरण औटी, जिल्हा उद्योग केंद्राचे पांडुरंग मोरे, उपसभापती दिलीपसिंह गौतम, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत राजु मनियार, भाजपा महिला तालुकाध्यक्ष सुलोचना ताई वेदपाठक, पं.स.सदस्य वामन डावरे, आदि, उपस्थित होते. या कार्यक्रमात संविधान दिनानिमित्त संविधान प्रतिज्ञेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच 26/11 मध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
उमरगा, लोहारा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांना उद्योग विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या महत्वपूर्ण अभियानाचा जास्तीत जास्त युवकांनी योजनेचा लाभ घेऊन पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अगोदर सक्षम व्हावे आत्मनिर्भर होऊन इतरांना मदत करावी, असे सविस्तर मार्गदर्शन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, महाराष्ट्र औधोगिक वसाहत महामंडळाचे अधिकारी व राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी सदरील उद्योग व्यवसायसंदर्भात माहिती व उभारणीसाठी लागणारी प्रक्रिया या सर्व प्रक्रियेची सविस्तर माहिती भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे शुशांत भुमकर यांनी दिली.
तसेच विविध योजनांची माहिती प्रा.किरण आवटे व जिल्हा उद्योग केंद्राचे पांडुरंग मोरे, यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उमरगा शहराध्यक्ष पदी किरण रामतीर्थे यांची तर युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी अजय वेदपाठक, महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी रानी पिंटू राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी भाजपा कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, उमरगा तालुका सरचिटणीस सिध्देश्वर माने, अभिषेक पवार, लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, नेताजी शिंदे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, मुरुम शहराध्यक्ष गुलाब डोंगरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, उमरगा शहराध्यक्ष किरण रामतीर्थे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, जयेश सुर्यवंशी, अनिल बिराजदार, प्रशांत माने, यांच्यासह उमरगा, लोहारा तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस सिद्धेश्वर माने यांनी केले तर आभार जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी यांनी मानले.