लिंगायत समाजाच्या वतीने,कुमार सागर स्वामी,बालाजी मेणकुदळे यांचा सत्कार
लोहारा/प्रतिनिधी
अखिल भारतीय शिवा संघटना तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गायकभूषण पुरस्कार लोहारा येथील गायक, कीर्तनकार कुमारसागर संभ्यया स्वामी यांना श्री क्षेत्र कपिलधार जि.बीड येथे शिवा संघटनेच्या २६ व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात दि.१८ नोव्हेंबर रोजी शिवा संघटना संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
तसेच शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित आश्रम शाळा संघटना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी श्री संत मारुती महाराज निवासी अनुसूचित आश्रम शाळा भातागळी संस्थापक अध्यक्ष बालाजी मेणकुदळे यांची निवड झाल्याबद्दल लोहारा येथील लिंगायत महासंघ व समस्त लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात दि.२४ नोव्हेंबर रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
जेष्ठ नागन्ना वकील, चंद्रकांत पाटील, पंचय्या स्वामी, लिंगायत महासंघ जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ जट्टे, तालुकाध्यक्ष शंकर अण्णा जट्टे, उपाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, सचिव जालिंदर कोकणे, काशिनाथ स्वामी, तालुका कार्याध्यक्ष बसवराज बिडवे, प्रसिद्धी प्रमुख गणेश खबोले, विठ्ठल वचने-पाटील, के.डी.पाटील, दिपक मुळे, हरी लोखंडे, श्रीशैल्य मिटकरी, शिवमूर्ती मुळे, बसवराज तोडकरी, रमेश ठेले, मल्लिनाथ घोंगडे, संजय मिटकरी, विर फावडे, बंडाप्पा वैरागकर, बाळु पाटील-घोंगडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन जालिंदर कोकणे यांनी केले तर आभार वैजिनाथ जट्टे यांनी मानले.