३० हजार रुपये स्वीकारताना बसवेश्वर स्वामी यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयात अँटी करप्शन विभागने रंगेहात पकडले

0
३० हजार रुपये स्वीकारताना बसवेश्वर स्वामी यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयात अँटी करप्शन विभागने रंगेहात पकडले

सोलापूर :- लाच लुचपत विभागाने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयात सोमवारी सायंकाळी कारवाई केली आहे.या कारवाईमध्ये बसवेश्वर महादेव स्वामी(वय 45 ,सहायक प्रशासन अधिकारी,) यास तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.या कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील प्रशासन हादरले आहे.सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.शासकीय नोकरदार लाचेची मागणी करत असेल तर अँटी करप्शन विभाग सोलापूर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक संजीव पाटील यांनी केले आहे.लाच घेणारा अधिकारी बसवेश्वर स्वामी याकडे जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातील अतिरिक्त कार्यभार होता.


प्राप्त तक्रारीनुसार संशयीत आरोपी लोकसेवक हा 2 तारखेला लाच मागितली होती.त्याबाबत अँटी करप्शन विभागाने पडताळणी केली होती.प्राप्त तक्रारीनुसार मुक्काम पोस्ट हिंगणी निपाणी (ता मोहोळ,जि सोलापूर) येथे अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यांचा विकास करणे या योजने अंतर्गत विविध विकास योजना करिता हिंगणी येथील ग्रामसभेत ठराव मंजूर झाला होता.ठरावानुसार कामाचा प्रस्ताव समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांकडे सादर करण्यात आला होता.याबाबत हिंगणी गावचे सरपंच पाठपुरावा करत होते. समाज कल्याण विभागातील अतिरिक्त अधिकारी बसवेश्वर स्वामी यांनी 30 हजार  लाचेची मागणी केली होती.हिंगणी गावातील नागरिकांनी संबंधित संशयीत आरोपी लोकसेवक याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारींची पडताळणी 2 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.आणि सोमवारी 8 नोव्हेंबर रोजी समाज कल्याण विभागात तीस हजार रुपये स्वीकारताना बसवेश्वर स्वामी यांच्यावर रंगेहात  कारवाई करण्यात आली.

ही कारवाई उपअधीक्षक संजीव पाटील,पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक,चंद्रकांत कोळी,आदींनी केली आहे.सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बसवेश्वर स्वामी हा अँटी करप्शन यांच्या ताब्यात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top