आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ( ढकली ) हॉलीबॉल स्पर्धा संपन्न
उस्मानाबाद जिल्ह्याचे लोकनेते भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अभिष्टचिंतन निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा व छत्रपती व्हॉलीबॉल संघ यांच्या संयुक्तिक विद्यमानाने भव्य (ढकली) व्हॉलीबॉल या स्पर्धेचे उदघाटन भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते केले ,या स्पर्धेचे आयोजन भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने व छत्रपती व्हॉलीबॉल संघाने या स्पर्धेचे आयोजन बार्शी नाका येथील शरद पवार हायस्कूल च्या मैदानावर केले.
जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
यावेळी जि. प. माजी अध्यक्ष नेताजी पाटील, पं. स. उपसभापती प्रदीप शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, विजय सस्ते सर ,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रोहित दंडनाईक, जिल्हा उपाध्यक्ष अभीराम पाटील, प्रवीण पाठक,जि उपाध्यक्ष संताजी वीर, सरचिटणीस ऍड कुलदीप भोसले ,सचिव प्रीतम मुंडे ,तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी ,विद्यार्थी जिल्हा संयोजक विशाल पाटील ,प्रसाद मुंडे ,सुजित साळुंके ,खोत सर ,स्वप्नील नाईकवाडी ,अर्जुन पवार ,अजय उंबरे ,अजिंक्य मुंडे , आकाश मुंडे , नागेश मगर, सचिन जाधव , शैलेश काटे , निश्चित राठोड , सतीश सरफाळे , दत्ता धोंड , ऋषिकेश मुंडे , सागर वडतिले , निलेश मुंडे , शुभम काटे , योगेश कदम , आदर्श साळुंखे , बालाजी शेरकर , चेतन भोसले , श्रीकांत अंबुरे , विशाल कुलकर्णी , दत्तात्रय कोळी सर , महेश मोरे , छत्रपती व्हॉलीबॉल संघाचे खेळाडु,व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व छत्रपती व्हॉलीबॉल संघ या सर्वानी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या स्पर्धेवेळी मोठया प्रमाणात क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती व्हॉलिबॉल संघ, उस्मानाबाद आयोजीत झालेल्या मॅचेस चा निकाल
1) तेर -प्रथम बक्षीस
2) आदर्श उस्मानाबाद- द्वितीय बक्षीस
3) येडशी-तृतीय बक्षीस
4) मुरुड- चतुर्थ बक्षीस
5) बालाजी नगर उस्मानाबाद- पाचवे बक्षीस
6) मातोळा- सहावे बक्षीस
7) छत्रपती संघ उस्मानाबाद- सातवे बक्षीस
8) बार्शी -आठवे बक्षीस
वरील सर्व विजेत्या संघाचे हार्दिक अभिनंदन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले