लोहारा ते अंबेजोगाई रोडची दुरवस्था, संबंधित गुत्तेदारावर कारवाई करा-ऑल इंडिया मुस्लिम ओ, बी,सी
लोहारा / प्रतिनिधी दि 8
लोहारा अंबेजोगाई, मुरुड, समुद्रवाणी, कनगरा, उजनी, लोहारा मगरुळ या रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे काम झाले असून चौकशी करुन अर्धवट झालेले काम संबंधीत गुत्तेदारा मार्फत करुन घेणे व निकृष्ठ काम केलेल्या संबंधीतीवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हा दाखल करणे बाबत दिनांक 08/03/2021 रोजी निवदेन दिले होते कसल्याही प्रकारची कार्यवाही किंवा रस्ता दुरुस्ती झालेली नाही
दिनांक 08/03/2021 रोजी लोहारा ते पाटोदा रोडचे खड्डे बुजीविण्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहेत असे निवेदन देण्यात आले होते परंतु या प्रकरणी कसलीही कार्यवाही झालेली नाही तीन महिन्याच्या आताच केलेले काम जसे थे तैसे आहे. संबंधीत अधिकारी व गुत्तेदारी यांनी हाप्ता मिळावणी करून शासनाचे लाखो रु. हडप केले आहे. खड्डे बुजविण्याचे काम हे देखाण्या स्वरुपाचे केले होते त्याच वेळी तक्रारी करून ही संबंधीत गुत्तेदाराशी हप्ता मिळळवणी करुन चिरीमीरी खाऊल सदर कामावर पडदा टाकलेला आहे. आज या रस्त्याची दुराव्यस्था झालेली आहे. अनेक या रस्त्यावर अपघात होऊन नागरीक जखमी झालेल आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी लोहारा तालुक्यामध्ये पाटोदा ते लोहारा रस्त्यावर पडलेली खड्डे बुजविण्याचे काम हे विद्यासागर व्ही. कामभोज सुशिलनगर जुना औसा रोड लातूर या गुप्तैदारामार्फत करण्यात आले असून सदर गुत्तेदाराने निकृष्ठ दर्जाचे व अर्धवट खड्डे बुजविण्याचे काम केले असून याबाबत काम चालू असतानाच सा. बां. उपविभाग लोहारा येथील संबंधित कर्मचारी यंना स्थळाच्या ठिकाणी दाखविण्यात आले होते. त्यांना तोंडी वेळोवेळी सांगण्यात आले होते परंतु ते चांगले काम व अर्धवट राहिलेले काम करुन घेवू असे आश्वासन दिले. परंतु ते त्यांना काम पूर्ण केलेले नाही. सदर कामाची आपण आपल्या स्तरावरुन पाहणी केल्यास निर्दशनास येईल व संबंधित गुत्तेदाराने आपल्या कार्यालयामार्फत जे नियमावली व अटी घालून दिलेले आहे त्याचे पालन केलेले दिसून येत नाही.
, मोठया आकाराचे खड्डे हे 50 मी.मी. जाडीच्या एम.पी.एस. सिलकोटसह भरलेले नाही.
,छोटे आकाराचे खड्डे हे सरफेस ट्रेनिंग सिलकोटसह भरलेले नाही. , सदर डांबरी रस्त्याच्या बाजूपट्टया कठिण मुरुमाने भरलेले नाही व चढलेले बाजूपट्टया तासलेले नाही.
, कांही बाजूपट्टया हया डांबरी पृष्ठभागापेक्षा उंच झालेल्या आहेत. अशा ठिकाणचा पाणी निचरा होत नाही तशा बाजू पट्टया या तासलेल्या नाही, डांबरचा प्रमाण कमी केल्यामुळे संपूर्ण काम निकृष्ठ दर्जाचे झालेले असून संबंधि ठेकेदाराशी सा. बां. उप विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे हातमिळवणी सगणमत करुन या गुत्तेदारास निकृष्ठ काम करण्यास मदत करीत आहेत असे दिसून येत आहे. तरी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कामाची तपासणी करुन कार्यवाही करावी अन्यथा ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशनच्या वतीने सा.बा. उप विभाग लोहारा कार्यालयाच्या समोर अमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर महेबुब फकीर ,सलीम कुरेशी , युसुफ कुरेशी , हाजी आमिन सुंबेकर, ज्ञानोबा लक्ष्मन शिंदे , महादेव धारूळे आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.