उस्मानाबाद :- वारंवार निवेदन देऊनही नियमबाह्य गुंठेवारी करणाऱ्या नळदुर्ग नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी दि.८ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात याप्रकरणी एक महिन्याच्या आत कारवाई नाही झाल्यास दि.१० डिसेंबर २०२१ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेत रुजु झाल्यापासुन ते आजपर्यंत नगरपालिका हद्दीत बेकायदेशीर व नियमबाहय गुंठेवारी नियमाधीन केल्याचे उघडकीस आले आहे. मुख्याधिकारी म्हणुन नगरपालिकेचा पदभार घेतल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेत अनेक नियमबाहय कामे केली आहेत.
त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील कांही जमीन मालकांच्या जमीनीच्या बेकायदेशीर गुंठेवारीची नियमबाहय नोंदी करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर या गुंठेवारीची नोंदी घेत असताना जमीन एका बाजुला आणि गुंठेवारी ची नोंद केलेली जमीन एका बाजुला आहे,
असा प्रकार जमीन मालकांनी मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरुन केला आहे. त्याचबरोबर बनावट गुंठेवारी करुन पालिकेतील दप्तराला बेकायदेशीर नोंदी करण्यात आल्या आहेत. या नोंदीच्या आधारे जमीन मालकांनी प्लॉट घेणाऱ्या नागरीकांना अंधारात ठेऊन अशा जमीन मालकांकडून बोगस गुंठैवारीच्या नोंदीच्या आधारे प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आहे.
त्यामुळे संबंधीत मुख्याधिकारी यांच्यावर तात्काळ या प्रकरणी कारवाई करावी व कारवाई होई पर्यंत मुख्याधिकारी यांची बदली करण्यात येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.८ नोव्हेंबर २०२१ रोजी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सदस्य ,विलास येडगे व शिवाजी नाईक हे एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणास बसले होते.
वारंवार निवेदन देऊनही याबाबत काहींचं कारवाई झाली नसल्याने व याप्रकरणी आता एक महिन्यात कोणतीच कारवाई नाही झाली तर पुढील उपोषण औरंगाबाद येथे दि. १० डिसेंबर २०२१ वार शुक्रवार रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.
तरी या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी यांची या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती,नगर विकास मंत्री, मुंबई, विभागीय आयुक्त,संभाजीनगर,यांना देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सदस्य, विलास येडगे व शिवाजी नाईक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.