चोरीच्या स्मार्टफोनसह दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा : ईरफान शेख, रा. कनगरा, ता. उस्मानाबाद यांसह गावातील 7 व्यक्ती दि. 30- 31.05.2021 दरम्यानच्या रात्री कनगरा गट क्र. 209 मधील शेतातील पत्रा शेडसमोर झोपलेले होते. दरम्यान त्यांच्या उषाचे एकुण 7 स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. यावरुन शेख यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 91 / 2021 हा नोंदवला आहे.
तपासादरम्यान उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्याच्या पोउपनि- किरवाडे यांच्या पथकाने तांत्रिक अभ्यास केला असता या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या स्मार्टफोनपैकी 2 स्मार्टफोन हे सांजा रोड, उस्मानाबाद येथील सुरज बजरंग भिसे व संतोष गोवर्धन धोत्रे यांच्याकडे असल्याचे निदर्शनास आले. या प्राप्त माहितीच्या आधारे स्था.गु.शा. च्या सपोनि- श्री. शैलेश पवार, पोहेकॉ- शेळके, धनंजय कवडे, पोकॉ- सुनिल मोरे, सर्जे यांनी सांजा रोड येथून काल दि. 09 नोव्हेंबर रोजी चोरीच्या स्मार्टफोनसह नमूद दोघांना ताब्यात घेउन त्यांस बेंबळी पो.ठा. च्या ताब्यात दिले असून उर्वरीत तपास बेंबळी पोलीस करत आहेत.