उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरी गुन्हे दाखल

0



उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरी गुन्हे दाखल 

लोहारा पोलीस ठाणे : सास्तुर, ता. लोहार ग्रामस्थ- शुभांगी डांगे या त्यांच्या आईसोबत दि. 17- 18.11.2021 दरम्यान एका दवाखान्यात होत्या. नमूद काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील कपाटात ठेवलेले 5 ग्रॅम सुवर्ण दागिने व 10,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या शुभांगी यांनी दि. 23 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत दत्तु भाकर, रा. जंगले प्लॉट, लोहारा यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 व्ही 7152 ही दि. 15.11.2021 रोजी 18.00 ते 19.45 वा. दरम्यान त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या भोकरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा पोलीस ठाणे : उपळाई, ता. कळब ग्रामस्थ- सुनिल भाउनाथ मुंढे यांच्या शेत गट क्र. 147 मधील शेत विहिरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा टेक्स्मो पानबुडी विद्युत पंप दि. 17- 23.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुनिल यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

आनंदनगर पोलीस ठाणे : समर्थ नगर, उस्मानाबाद ‘अंजली इंडस्ट्रीज’ च्या शेडचा पाठीमागील बाजूचा पत्रा दि. 20- 22.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने उचकटून आतील कॉपर यु 60 नग, कॉपर एल्बो 30 नग, भंगार कॉपर 2 पोते व एक स्मार्टफोन चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या दुकान मालक- चंद्रकांत पांडुरंग शिंदे, रा. उस्मानाबाद यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

तुळजापूर पोलीस ठाणे : आकाश मस्के यांची होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 13 सीए 3017 व हिरो सीडी डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 13 सीडी 9780 या दोन्ही मो.सा. दि. 21.11.2021 रोजी 15.00 ते 16.00 वा. दरम्यान तुळजापूर येथील पावन लॉज समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या आकाश मस्के यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top