लोहारा शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर -- आ.ज्ञानराज चौगुले

0

लोहारा शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर -- आ.ज्ञानराज चौगुले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडुन नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजने अंतर्गत निधी मंजूर झाला असुन यासाठी आ.ज्ञानराज चौगुले यांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता. 

यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निधीतून लोहारा शहरातील विविध प्रभागातील महत्त्वांच्या रस्त्यांची कामे पुर्ण करण्यात येणार आहेत. यापूर्वी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत विविध प्रभागात मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून घेऊन कामे पुर्ण करण्यात आली आहेत. परंतु अनेक प्रभागात विकास कामांना निधी प्राप्त न झाल्याने येथील समस्या कायम होत्या. या अनुषंगाने उर्वरित कामांसाठी सदर योजनेतून निधी मंजूर करुन घेतला आहे. यापुढील काळातही लोहारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरगोस निधी उपलब्ध करून देण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केल्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले व निधी मंजूर केल्याबद्दल आ.ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील यांचे आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top