स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करावी -- धनंजय कुलकर्णी

0

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करावी -- 
धनंजय कुलकर्णी 

लोहारा/प्रतिनिधी
येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढविण्याच्या दृष्टीने पक्षाकडून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी उमरगा शहर आणि तालुक्यातील सर्व बूथ रचना करून येणारी नगर परिषद आणि जि.प.आणि पं.स. निवडणुका ताकदीने लढवून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठवावेत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तयारी करावी अशी सुचना भारतीय जनता पार्टीचे समर्थ बूथ अभियानचे मराठवाडा विभागीय संयोजक आणि विभाग कार्यालय मंत्री धनंजय कुलकर्णी यांनी केली. यावेळी जिल्हा सरचिटणीस माधव पवार, तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, प्रभारी नगराध्यक्ष राजू गायकवाड, सिद्धेश्वर माने, नगरसेवक गोविंद घोडके, महादेव सलके, बाबुराव कलशेट्टी, किरण रामतीर्थे, अमर वरवटे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top