google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जनता सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२१ , संचालक मंडळाच्या सत्तांतरा साठी जनता बँकेची निवडणूक

उस्मानाबाद जनता सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२१ , संचालक मंडळाच्या सत्तांतरा साठी जनता बँकेची निवडणूक

0

उस्मानाबाद जनता सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूक २०२१

 संचालक मंडळाच्या सत्तांतरा साठी जनता बँकेची निवडणूक

 उस्मानाबाद (प्रतिनिधी) वीस वर्षानंतर उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची निवडणूक होत आहे अन्यायग्रस्त कर्मचारी आणि दुर्लक्षित सभासदांच्या योगदानातून ही निवडणूक होत असल्याची माहिती उस्मानाबादेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परिवर्तन पॅनल च्या वतीने देण्यात आली. सुधीर केशवराव पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,ज्येष्ठ नेते ॲङ. मिलिंद पाटील, ॲड. खंडेराव चौरे यांच्यासह निवडणुकीतील उमेदवार यावेळी उपस्थित होते.
      निवडणूक सभासद आणि कर्मचारी यांच्या वतीने लावलेली निवडणूक आहे २० वर्षानंतर ही निवडणूक प्रत्यक्ष होत असून २० वर्षात ही निवडणूक बिनविरोध होत होती या निवडणुकीच्या पाठीमागे फक्त नागदे - मोदाणी असे एक नाव होते परंतु २०२१ मध्ये होत असलेल्या निवडणुकीत सभासदांनी केलेला उठाव कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय या माध्यमातून ही निवडणूक लावली गेली आहे आमच्या पाठीशी खंबीरपणे बँकेचे सभासद कर्मचारी असून विद्यमान संचालकांची २० वर्षातील कार्यपद्धत जर पाहिली तर या कार्यपद्धतीमध्ये ८० टक्के ठेवी  गोरगरीब कष्टकऱ्यांच्या असून २०टक्के ठेवी श्रीमंत आणि व्यापारी वर्गाच्या आहेत अशी परिस्थिती असताना यांनी जे कर्ज वाटप केलेली आहेत ती ८० टक्के उद्योगपती व्यापारी यांना तर २० टक्के सर्वसामान्यांना कर्जवाटप केले आहेत त्यामुळे या बँकेतील सर्व सभासद यांची एक भावना होती कधीतरी या बँकेची निवडणूक लागावी आणि जर ही निवडणूक लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू अशा पद्धतीने या सभासदांच्या भावनेचा आधार करून सभासद आणि कर्मचारी यांच्या वतीने हा पॅनल उभा की केला आहे हे पॅनल निश्चित विजयी होणार आहे हे पॅनल आमचे नसून मतदान करणारे कर्मचारी आणि सभासद यांचे आहे त्यांच्या वतीने आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. येथे पार्टी आणि पक्ष यांचा सहभाग नसून हे सर्व पक्षीय सर्व लोकप्रतिनिधी यांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे या पॅनल मध्ये सर्व उमेदवारांना स्वतःचे चेहरे आहेत गेली ८ वर्षांमध्ये विद्यमान संचालकांनी दावा केला आहे त्यांनी ३ नोव्हेंबर रोजी जाहीर प्रगटन करून ४० कोटी नफा बँकेला झालेला आहे मी जाहीरपणे सांगतो की ही बँक २५ ते ३० कोटी तोट्यात आहे गेली सात वर्षापासून ही बँक तोट्यात गेली असून या बँकेतील संचालकांनी सब स्टैंडर्ड अकाउंट झाकून स्टॅंडर्ड अकाउंट मध्ये घालून १५ कोटी रुपयांचा एनपीए लपवला आहे यामध्ये सभासद मतदारांची दिशाभूल करून हे प्रगटन केले आहे जर विरोधी पॅनल ची तयारी असेल तर आपण समोर चर्चेला तयार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले गेली ८ वर्षापासून हे काही सभासदांना लाभांश दिलेला नाही. त्यामुळे जर लाभांश दिलेला नसेल तर त्या बँकेला नफा झालेला नाही त्यामुळे बँकेला नफा झालेला नाही ही तर सर्वसामान्यांना सुद्धा गोष्टी कळू शकतात.
   मी कधीही कर्ज माफी मागितली नाही बँकेच्या संचालक मंडळातील नातेवाईक आणि हितसंबंध असणाऱ्यांची कर्जप्रकरणे यांनी तडजोडीने मिटवली असा आरोप देखील यावेळी केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top