शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप

0

 तुळजापुर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सांगवी का येथील तलाठी कार्यालयात भारताच्या 75व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत सांगवी काटी  व पांगरधारवाडी  येथील शेतकऱ्यांना मोफत सातबारा तलाठी कार्यालय सांगवी (काटी) येथे वाटप करण्यात आले.

 सांगवी काटी तलाठी कार्यालयात दोन्ही गावचे मिळून खातेदार 2364 असून सर्वांना मोफत सातबारा वाटप करण्यात येणार असल्याचे गावच्या तलाठी सौ संजवनी स्वामी यांनी या वेळी सांगितले. हा सातबारा डिजिटल स्वाक्षरी छायांकित असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे दोन्ही गावच्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त  होत आहे.


या वेळी सांगवी (काटी) गावच्या तलाठी सौ. संजवनी स्वामी सांगवी (काटी) गावचे  उपसरपंच श्री मिलिंद मगर,अनिल मगर, बाळासाहेब पाटील,बबन मगर जनार्धन मगर व  इतर शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top