मृत्युशय्येवर असताना ही गणिताची उपासना करणारे महान भारतीय गणिततज्ञ रामानुजन होते -राज्य गणित महामंडळ उपाध्यक्ष निकम के जी

0



मृत्युशय्येवर असताना ही गणिताची उपासना करणारे महान भारतीय गणिततज्ञ  रामानुजन होते -राज्य गणित महामंडळ उपाध्यक्ष  निकम के जी

उस्मानाबाद -दि.२२डिसेंबर मृत्युशय्येवर असताना ही गणिताची उपासना करणारा महान भारतीय गणित तज्ञ  श्रीनिवास रामानुजन होते असे प्रतिपादन राज्य गणित महामंडळाचे उपाध्यक्ष आणि श्री भोसले हायस्कूलचे सहशिक्षक श्री निकम के जी यांनी श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये प्रथम थोर गणित तज्ञ श्रीनिवास अय्यंगार  रामानुजन यांच्या १३४व्या जयंती निमित्त बोलताना केले यावेळी रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेत्यानंतर इयत्ता आठवीच्या सर्व तुकड्यांमध्ये गणित सूत्र-वीर स्पर्धा घेण्यात आली होतीत्यातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले,तद्पश्चात प्रशालेतील गणित विभागाच्यावतीने श्री.कुमार गोविंदराव निकम यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळावर उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे उपमुख्याध्यापक- मा.श्री.एस.बी. कोळी सर यांनी भूषविले,तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक- मा.श्री. इंगळे वाय.के. सर आणि गणित विभाग प्रमुख-मा.श्री वीर डी.जे.सर लाभले होते,

      आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये श्री. वीरसरांनी विद्यार्थ्यांनी गणित विषय आयुष्यभर साथ देण्यासाठी हवा असेल,तर मूलभूत संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजेत,असे मत व्यक्त केले तसेच पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सराव करावा असे सांगितले,आपल्या सत्काराला उत्तर देताना श्री.निकम सर यांनी रामानुजन यांचा संपूर्ण जीवनपट रोमहर्षक पणे विद्यार्थ्यांपुढे मांडला,अध्यक्षीय समारोप करताना मा.श्री.कोळी सरांनी सर्व विद्यार्थ्यांना रामानुजन यांच्या प्रमाणे गणितामध्ये यश प्राप्त करण्याचा सल्ला दिला,तसेच प्रशालेच्या वतीने त्यांनी राष्ट्रीय गणित दिनाच्या व श्री.निकमसर यांना त्यांच्या उपाध्यक्ष पदाच्याभावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या,या कार्यक्रमासाठी अंतिमतः इयत्ता आठवीचे पर्यवेक्षक मा.श्री.टी.पी.शेटे सर यांनी सर्वांचे आभार मानले,या कार्यक्रमाला श्री.रामेश्वर बोबडे सर,श्री.एस.एम. देशमुख सर,श्री.व्ही.बी. इंगळे सर,श्री.डी.व्ही. इनामदारसर या जेष्ठ गणित शिक्षकांची उपस्थिती लाभली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top