उस्मानाबाद जिल्ह्यात २ ठिकाणी चोरी , २ ठिकाणी अपघात , २ ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल
“चोरी.”
वाशी पोलीस ठाणे : पखरुड शिवारातील इंडस कंपनीच्या मनोरा येथील जिवोचे कॉपर वायर 8 नग असे 10 मीटर वायर दि. 18.12.2021 रोजी 00.30 ते 02.00 वा. दरम्यान पारधी पिढी, लोणखस येथील दोन- तीन संशयीत पुरुषांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या महादेव ढवण, रा. खंडाळा, ता. तुळजापूर यांनी दि. 21 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे : खानापूर, ता. परंडा येथील अशोक महादेव गटकुळ यांनी दि. 21.12.2021 रोजी 15.30 ते 17.30 वा. दरम्यान अंगावरी सदरा शेतातील शेडमध्ये अडकवला असता दरम्यानच्या काळात गावातील एका संशयीताने शेडमध्ये जाउन त्या सदऱ्याच्या खिशातील 4,500 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या अशोक गटकुळ यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे : बलसुर, ता. उमरगा येथील मुमताज ईमाम पटेल या 52 वर्षीय महिला दि. 24.09.2021 रोजी 18.00 वा. सु. करदोडा येथील रस्त्याने पायी चालत जात होत्या. यावेळी अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत मुमताज या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अशा मजकुराच्या मयतेचा मुलगा- मेहबुब ईमाम पटेल यांनी दि. 21 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत चालक- नरेंद्र ज्ञानोबा काळे, रा. माडज, ता. उमरगा यांनी दि. 20.12.2021 रोजी 04.00 वा. सु. चिंचपुर – तुरोरी रस्त्यावर मोटारसायकल निष्काळजीपने चालवल्याने रस्त्यावरील खड्ड्यात मो.सा. आदळून पाठीमागे बसलेल्या संगम्मा करबसप्पा शेरी, वय 60 वर्षे, रा. खजुरी, ता. आळंद, जि. कलबुर्गी या खालीपडून जखमी झाल्या. अशा मजकुराच्या संगम्मा शेरी यांनी दि. 21 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
आनंदनगर पोलीस ठाणे : अमृतनगर, उस्मानाबाद येथील शकील मैनुद्दीन शेख हे दि. 21.12.2021 रोजी 18.30 वा. सु. कॉलनीतून पायी जात असतांना एका मोटारसायकलवर आलेल्या कॉलनीतीच- सद्दाम पठाण, सलमान पठाण, चाँद पठाण यांनी शकील शेख यांना पाठीमागून मो.सा. चा धक्का दिला. तसेच नमूद तीघांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शेख शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन चाकूने हातावर, पाठीवर वार करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शकील शेख यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोन पोलीस ठाणे : हासेगाव, ता. कळंब येथील जनार्धन राजाराम राऊत व बालाजी राउत हे दोधे पिता- पुत्र गौरगाव, ता. कळंब ग्रामस्थ- अविनाश शिरीष पाटोळे यांना वेळोवेळी फोनद्वारे, भेटून शिवीगाळ करुन धमकावत होते. यावर अविनाश पाटोळे यांनी दि. 20.12.2021 रोजी 09.00 वा. सु. हासेगाव येथे ग्रामपंचायत समोर असतांना राउत पिता- पुत्रांस त्याचा जाब विचारला असता त्यांनी पाटोळे यांना शिवीगाळ करुन लाकडी फळी डोक्यात मारुन पाटोळे यांना गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या अविनाश पाटोळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506, 507, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.