उस्मानाबाद जिल्हा : जिल्ह्यातील एका खेडेगावातील 21 वर्षीय मतीमंद, मुकबधीर तरुणीस तीच्या कुटूंबीयांनी शेतातील पत्रा शेडमध्ये कुलूप बंद करुन ठेवले असल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने दि. 18-19.12.2021 दरम्यानच्या रात्री कुलूप तोडून शेडमधील त्या तरुणीस मारहान करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला होता. यावरुन भा.दं.सं. कलम- 376, 452, 324 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
यातील पिडीत तरुणी ही मतीमंद, मुकबधीर तसेच गंभीर जखमी झाल्याने आंतर रुग्ण असून गुन्हा हा अंधाऱ्या रात्री तसेच निर्जन शेतात घडल्याने आरोपी निष्पन्न करण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. पोलीसांनी कौशल्य पुर्वक तपास करुन तांत्रिक माहिती, खबऱ्यांच्या सहकाऱ्याने माहिती घेतली असता हा गुन्हा गावातीलच एका 26 वर्षीय तरुणाने केला असल्याचे निष्पन्न झाले. यावर त्यास आज दि. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी अटक करण्यात येउन पुढील तपास पिंक पथकामार्फत (महिला विरोधी अत्याचार तपास पथक) केला जात आहे.