google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 रस्त्याचे बोगस काम! , १५ दिवसात अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्यास आत्मदहन - प्रशांत साळुंके यांचा प्रशासनाला इशारा

रस्त्याचे बोगस काम! , १५ दिवसात अंदाज पत्रकाप्रमाणे काम न केल्यास आत्मदहन - प्रशांत साळुंके यांचा प्रशासनाला इशारा

0

उस्मानाबाद (प्रतिनिधी) मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते बार्शी नाका या रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम बोगस झालेले आहे. अंदाज पत्रकानुसार १५ दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीचे काम न झाल्यास कोणत्याही क्षणी आत्मदहन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

         उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना २९ डिसेंबरला दिलेल्या लेखी निवेदनात प्रशांत साळुंके यांनी या रस्त्याची दुरावस्था मांडलेली आहे. निवेदनात नमूद केले आहे की,सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद यांच्या अधिपत्याखाली तेरणा महाविद्यालय ते आयुर्वेदिक महाविद्यालय आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पासून बार्शी नाका पर्यंतचा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम एस बी कंट्रक्शन औरंगाबाद यांना देण्यात आले होते.


     या रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने माणिक चौक,रोमा हॉटेल समोरील रस्ता या ठिकाणी डांबरीकरण न केल्याने रस्त्याचा भाग उघडा पडला आहे. या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. अशीच परिस्थिती विद्युत वितरण कार्यालय समोर झाल्याने रस्ता खर्चून जम्पिंग होत आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नसल्याने लहान मुले,गाडी चालक खड्ड्यात गेल्याने जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.


      सदर ठेकेदाराने कामाच्या अंदाजपत्रकानुसार या रस्त्याचे काम १५ दिवसात पूर्ण करावे अन्यथा १५ दिवसानंतर कोणत्याही क्षणी आपण आत्मदहन करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा दिलेला आहे. तसेच बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांची काळे यादीत नोंद करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात साळुंके यांनी केलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top