प्रतिनिधी : सांगवी (काटी)
आर्थिकद्रट्या तोटयात असणाऱ्या तुळजापुर तालुक्यातील सांगवी ( काटी ) विविध कार्यकारी सेवा सोसायटीची प्रतिष्ठेपायी लावलेल्या निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान होवुन ४१२ सभासदानी हक्क बजावला मतमोजणी निकाल जाहीर होवुन महाविकास आघाडीने 09जागा जिंकत बाजी मारली
सांगवी ( काटी ) ता तुळजापुर विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ निवडणुकीसाठी गुरुवारी ११ जागासाठी मतदान प्रक्रीया पार पडली ४१२ मतदारानी हक्क बजावला निवडणुक मत मोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालात १३पैकी 09 जागा महाविकास आघाडीने जिकुन वर्चस्व निर्माण केले आहे
सांगवी ( काटी ) विविध कार्यकारी सेवा सोसायटीची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे यात संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दोन्ही पॅनलच्या अविरोध निवडीसाठी तिन बैठका झाल्या मात्र जागा वाटपा वरून एकमत न झाल्याने अखेरही निवडणुक प्रतिष्ठेची करून दोन्ही पॅनलने उमेदवारी अर्ज दाखल केले ११ जागासाठी २१ उमेदवारानी प्रतिष्ठा पणाला लावली गुरूवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत शेतकरी सभासदानी मतदानाचा हक्क बजावला सांयकाळी साडे चार वाजता मतमोजनी जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाली हाती आलेल्या निकाला नुसार मोहन जाथव , हरीभाऊ मगर , कालीदास मगर , मधुकर मगर , मारूती मगर , सतिश मगर , मधुकर मोरे , नागनाथ मारडकर , भुजंग सुरते भाग्यश्री कदम , विजया मगर
निवडणुक अधिकारी म्हणुन ही के आगळे यानी काम पाहीले निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यानी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला तामलवाडी पोलीसाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता
*अमृत मोटे बिनविरोध*
गोंधळवाडी येथील माजी सरपंच अमृत मोटे यांची शेतजमीन सांगवी (काटी ) शिवारात असुन ते सांगवी सोसायटीचे सभासद आहे यंदा राखीव जागेवर विरोधी पॅनलला ' उमेदवार न मिळाल्याने अमृत मोटे हे दूसऱ्यांदा अविरोध निवडून आले आहेत
*चिठ्या टाकुन विजयी*
कर्जदार गटातील उमेदवार मधुकर मगर व आनंद कदम यांना प्रत्येकी १६७ समान मते मिळाली त्यामुळे एका जागेचा निकाल अखेर चिठ्या टाकून घोषीत करण्याचा निर्णय घेण्यात आला चिठ्या टाकल्यानंतर बाळु कोळी या नामक शिपायाने चिठ्ठी उचलली तेव्हा चिठ्ठीत मधुकर मगर यांचे नाव निघाल्याने त्यानां विजयी घोषीत केले.