नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत मिळावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा वीटभट्टी उद्योग मालक संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

0


नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत मिळावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा वीटभट्टी उद्योग मालक संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन


उस्मानाबाद जिल्ह्यात काल दिनांक 2 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील लघु उद्योग वीट निर्मिती करणाऱ्या उद्योगाचे अतोनात नुकसान झाले आहे पावसामुळे नीट उद्योगाचे मातीमोल नुकसान झाले आहे वीट निर्मितीसाठी उद्योजकांनी यासाठी कर्ज घेऊन हा लघुउद्योग निर्माण केला आहे परंतु या पावसामुळे खूप नुकसान झाल्यामुळे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत लघुउद्योजक मानसिक तणावाखाली आलेला आहे तरी जिल्हाधिकारी यांच्याकडे विटभट्टी उद्योजक यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई शासनाकडून मिळवून द्यावी व तसेच यावर्षीची रॉयल्टी यातून सूट देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा वीटभट्टी उद्योजक मालक संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे तसेच ऊस कामगार कायद्याच्या धर्तीवर वीट भट्टी कामगारांना यामध्ये समाविष्ट करून सहकार्य करावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी उस्मानाबाद जिल्हा वीटभट्टी उद्योजक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत साळुंके, उपाध्यक्ष शौकत शेख, सचिव शंकर साळुंके,खाजामिया मुलानी, श्रीनिवास रणदिवे,प्रमोद गायकवाड, सचिन कळमकर, शेख असलम, बापूसाहेब घोगरे,शैख अलुमिद्दीन ,अमर बाकले, शशिकांत शिंदे , बाळासाहेब सिरसट, बापुसाहेब घोंगते ,राजाभाऊ सूर्यवंशी , राजेन्द्र पाटील, इंद्रजित लोमटे , हनुमंत रवळे , राम माने, बापूराव जाधव, धनजय वाकुरे, विजय गवळी, अल्ताफ सय्यद, हुसैन सास्तुरे,सलाउद्दीन शेख,शहेबाद शैख आदींसह उस्मानाबाद जिल्ह्यातील वीट भट्टी उद्योजक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top