उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी अपघात, दोन ठिकाणी मारहाण
अपघात
ढोकी पोलीस ठाणे : तडवळा (क.), ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- प्रकाश महादेव पानढवळे, वय 50 वर्षे हे दि. 04.11.2021 रोजी 18.30 वा. सु. तडवळा - ढोकी रस्तयाने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीजी 7845 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने मो.सा. क्र. एम.एच. 25 एटी 9497 ही निष्काळजीपने चालवून प्रकाश पानढवळे यांच्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- दिलीप पानढवळे यांनी दि. 01.12.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे : कन्हेरवाडी, ता. कळंब येथील भाग्यश्री संतोष कवडे, वय 45 वर्षे या दि. 29.11.2021 रोजी 18.30 वा. सु. कन्हेरवाडी फाटा येथील रस्त्याकडेला थांबलेल्या असताना ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 एजे 2053 च्या धडकेत भाग्यश्री यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले. या अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या भाग्यश्री कवडे यांनी दि. 01.12.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत बारातेवाडी, ता. कळंब येथील अच्युत लालासाहेब बाराते हे कुटूंबीयांसह दि. 27.11.2021 रोजी 12.30 वा. सु. हासेगांव शिवारातील रस्त्याने चारचाकी वाहनाने प्रसास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने वाहन क्र. एम.एच. 43 एएन 7762 ही निष्काळजीपने चालवून अच्युत बाराते चालवत असलेल्या वाहनास समोरुन धडक दिली. या अपघातात अच्युत बाराते यांसह त्यांच्या कुटूंबातील 4 व्यक्ती जखमी झाले. अशा मजकुराच्या अच्युत बाराते यांनी दि. 01.12.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : सोलापूर येथील मल्लीनाथ कल्लप्पा जळकोटे, वय 40 वर्षे हे दि. 26.11.2021 रोजी काक्रंबा गावातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 सीआर 0748 ही चालवत जात होते. यावेळी मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 4586 च्या अज्ञात चालाकाने चुकीच्या दिशेने निष्काळजीपने मो.सा. चालवून मल्लीनाथ जळकोटे यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात जळकोटे हे गंभीर जखमी होउन मयत झाले नमूद मो.सा. चा अज्ञात चालक स्वत: जखमी झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- महादेवी जळकोटे यांनी दि. 01.12.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
आनंदनगर पोलीस ठाणे : उस्मानाबाद येथील पृथ्वीराज भाऊराज मस्के व यशराज हे दोघे भाऊ परिक्षा अर्ज भरण्यासाठी दि. 30.11.2021 रोजी 12.30 वा. सु. भोसले हायस्कुल, उस्मानाबाद येथे मोटारसायकलने गेले असता मो.सा. लावण्याच्या कारणावरुन शाळेतील शिक्षक पवार, डोलारे, कापसे यांसह अन्य व्यक्तींनी मस्के बंधूंना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. अशा मजकुराच्या पृथ्वीराज मस्के यांनी दि. 01.12.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 323, 504, 34 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : तुरोरी, ता. उमरगा येथील आश्वीन मल्लीकार्जुन कस्तुरे व सोमनाथ या दोघा भावांत दि. 01.12.2021 रोजी 11.00 वा. सु. घरासमोरील अंगणात भांडणे चालू होते. यावेळी त्यांचा मोठा भाऊ- विकास व वडील मल्लीकार्जुन यांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आश्वीन व सोमनाथ यांनी वडील- मल्लीकार्जुन व भाऊ- विकास यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विकास कस्तुरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.