जातीवादी गुंडावर तात्काळ कारवाई कराराष्ट्रीय लहूशक्तीचे उस्मानाबाद जिल्हाधिकारी निवेदन

0

जातीवादी गुंडावर तात्काळ कारवाई करा
राष्ट्रीय लहूशक्तीचे उस्मानाबाद जिल्हाधिकारी निवेदन


उस्मानाबाद (प्रतिनिधी) मातंग समाजातील नागरिकांना मारहाण करणाऱ्या गाव गुंडाचा प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


       वाशिम जिल्ह्यातील लोणी खुर्द (ता. रिसोड) येथे जातीयवादी गाव गुंडांनी क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा फोटो आणि पाटी लावले वरून मातंग समाजाला मारहाण केली.

ः यामध्ये पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सुखदेव पारवे आणि वृद्ध महिला गंभीर जखमी झाले आहेत.रमेश साठे,कैलास साठे, रामभाऊ पारवे,सुखदेव पारवे,छाया साठे जखमी झालेले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या भागांमध्ये जातीयवादी गाव गुंडा मार्फत दलित समाजावर अत्याचार केला जात आहे.गावगुंडांची या भागांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे.

 प्रशासनाने तात्काळ गाव गुंडाचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय नवशक्तीचे उस्मानाबाद येथील उस्मानाबादचे निवासी जिल्हाधिकारी स्वामी यांना अमोल पेठे,पांडुरंग लाटे, सोमनाथ कांबळे,लखन बगाडे, विकास एडके, चंद्रकांत दुर्वे,सहदेव कसबे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top